माजी विद्यार्थी मंडळ

माजी विद्यार्थी मंडळ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत.

मित्रांनो, आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की या विद्यापिठातून शिक्षण घेतलेल्या तुमच्या सारख्या असंख्य यशस्वी विद्यार्थ्यांचे “माजी विद्यार्थी मंडळ” आपण स्थापन केले आहे. हे मंडळ म्हणजे आपल्या विद्यापीठाचा एक मोठा परिवार असणार आहे.

या मंडळामार्फत आपण विविध उपक्रम हाती घेणार आहोत. आपल्या सारख्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्कात राहाणे, विद्यापीठाच्या विविध उपक्रमात आपला सहभाग घेणे, विद्यापीठाच्या प्रगतीत तुमचे योगदान आणि शैक्षणिक – सांस्कृतिक कार्यक्रमात तुमचा सहभाग अशी अनेक उद्दिष्टे ठेवून हे माजी विद्यार्थी मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे.

आपण तर स्वतःची नोंदणी तर करावीच, परंतु, आपल्या परिचयातील अन्य विद्यार्थ्यांनाही नोंदणी करण्यास उद्युक्त करावे असे आग्रहाचे प्रतिपादन मा. कुलगुरू प्रो. ई. वायुनंदन आणि मा. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.नोंदणी विनामूल्य आहे.       

या मंडळाचे स्वरूप व उद्दिष्टे सविस्तर पाहण्यासाठी इथे क्लीक करा