कृषी विज्ञान विद्याशाखा : संचालकांचे मनोगत

संचालकांचे मनोगत


 

 

कृषी विज्ञान विद्याशाखेच्या संचालकांकडून शुभेच्छा

प्रिय विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो

आपल्या  कृषी विज्ञान विद्याशाखेची स्थापना १९८९ मध्ये झाली. तेंव्हा पासून मागे वळून न पाहता आपल्या समाजातील वंचित जनतेपर्यंत शिक्षण पोचविण्याच्या या कार्यात आपण अतिशय यशस्वी झालेलो आहोत.  आपण १९९० मध्ये केवळ ८१ विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली. पुढे नोंदणी संख्या दरवर्षी २०००० या प्रमाणे वाढत गेली. २०१८ पर्यंत एकूण संख्या ३,२०,००० वर पोचली. या विद्याशाखेने पारंपारिक शिक्षण पद्धतीतून गळालेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य वंचीतांपर्यंत, प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत, शेतकरी महिलांपर्यंत आणि ग्रामीण युवकांपर्यंत मराठी भाषेतून कृषीशिक्षण पोचवण्याची कार्यप्रणाली अवलंबिली आहे.

 

कृषी शिक्षणक्रमांबाद्द्ल वास्तव.

 

कृषी विद्या शाखेने १६ शिक्षणक्रम विकसित केले आहेत. त्यामध्ये माळी प्रशिक्षण प्रमाणपत्रापासून पदव्युत्तर संशोधन शिक्षणक्रमांचा समावेश आहे. ६० अभ्यास केंद्रे आहेत तर ६०० हून अधिक शिक्षक – मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुमारे २०,००० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षणक्रमांच्या  यादी मध्ये माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान, उद्यान विद्या पदविका , कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका, फळबागा उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका, फुलशेती व प्रांगणउद्यान पदविका , कृषी विज्ञान पदवी, उद्यान विद्या पदवी,, कृषी विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि संशोधन यांचा समावेश आहे. अन्य कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांची या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निष्पक्षपाती तुलना केली असता या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा दर्जा अधिक चांगला व उत्साहवर्धक आहे.                

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहयोग

कृषी शिक्षण विद्याशाखेस क्षमता वृद्धी व ज्ञान व्यवस्थापनासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहयोग प्राप्त आहेत. जसे की नाबार्ड (मुंबई), आय सी ए आर(नवी दिल्ली), इक्रीसॅट(हैदराबाद), आय एफ पी आर आय(वॉशिंग्टन), कोल(कॅनडा),इत्यादी.       

आमच्या कृषी शिक्षण क्रमांचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये.

आमच्या शिक्षणक्रमांचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असे की ते विद्यार्थीस्नेही आहेत. वेगवेगळ्या पातळीवरील प्रवेश, वेगवेगळ्या पातळीवरील निर्गमन, प्रमाणपत्रापासून पदव्युत्तर शिक्षणक्रमांपर्यंत    ऊर्ध्वगामी गतिशीलता, पारंपारिक शिक्षण पद्धतीतून गळालेल्या शेतकरी, महिला, युवक अशा   विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायास उपयुक्त होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व राज्य स्तरीय चार कृषी विद्यापीठे जवळपास २५,००० विद्यार्थ्यांना प्रवेश देतात तर आमचे विद्यापीठ एकटे २०,००० विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करते. या शिवाय, स्वयं अध्ययनाचे साहित्य, लेखी व प्रात्यक्षिक अभ्यासासाठी प्रत्यक्ष वर्गातील मार्गदर्शन व चर्चासत्रे, शिक्षणक्रम विकसनासाठी सर्व समावेशक आणि शास्त्रशुद्ध दृष्टीकोन, पूरक अधायण साहित्य आणि अभ्यास केंद्रांचे वेळो वेळी निरीक्षण असे आणिक मुद्दे या विद्यापीठाच्या अभूतपूर्व यशामागे आहेत.