निरंतर शिक्षण विद्याशाखा : उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

उत्पत्ति, दृष्टी आणि ध्येय

  • सम्प्रेषणाच्या सर्व माध्यमातून समाजातील ; विशेषतः ग्रामीण व तळागाळातील वंचित घटकांपर्यंततसेच काम करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी आणि ज्ञान अद्ययावत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींपर्यंत शिक्षण पोचविणे
  • झपाट्याने बदलणाऱ्या समाजाच्या गरजांनुसार ज्ञान अद्ययावत करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींना विविध क्षेत्रातील कौशल्ये व ज्ञान मिळण्यासाठी व्यवस्था निर्माण करून संशोधनावर आधारित शिक्षणाची व्दारे खुली करणे. 
  • नाविन्यपूर्ण व गरजेनुसार विविध शिक्षणक्रमांची निरंतर निर्मिती करून उद्योग व शिक्षण संस्था यांच्यात अनुबंध प्रस्थापित करणे. 
  • बदलत्या गरजानुसार निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून कला, कौशल्य व कारागिरी यावर आधारीत शिक्षणक्रमांची निर्मिती करून त्या द्वारे त्या क्षेत्रातील व्यक्तींना अद्ययावत करणे.
  • या विद्याशाखेच्या सर्व स्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग गरजेनुसार शिक्षणक्रम विकसित करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.